अशी असेल मोदींची 'बॉलिवूड कॅबिनेट'!

अशी असेल मोदींची `बॉलिवूड कॅबिनेट`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आज 16व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होतेय. एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार येणार, असंच बोललं जातंय. नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान बनल्यानंतर बॉलिवूडमधून आपले नेते निवडायचे असतील तर ते कोणाला निवडतील?

होम मिनिस्टर: जया बच्चन
जया बच्चन आपल्या घरात तीन कलाकारांना सांभाळतात. जया बच्चन कॅबिनेटमध्ये कोणतंही खातं सांभाळू शकतात. त्या खूप स्वीट पण स्ट्रेट फॉरर्वड आहेत. बॉलिवूड कॅबिनेटमध्ये गृह खातं त्या सांभाळू शकतात.

संरक्षण मंत्री: सलमान खान
सलमान बॉलिवू़डचा दबंग आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांची नवी आर्मी बनवण्याचं काम तो चांगलं करतो. शंभर जणांना एकट्यानं त्यानं पडद्यावर सांभाळलंय. आपल्या चित्रपटांमधून सलमाननं इतर देशांनाही धडकी भरवलीय. त्यामुळं सलमान भाईकडे जाणार संरक्षण खात.

परराष्ट्र मंत्री: शाहरुख खान
एनआरआयचा लाडका अभिनेता म्हणजे शाहरूख खान... युरोपीयन देशांमध्ये शाहरूखची क्रेझ आहे. गालावरची खळी, आलिंगण देण्याची पद्धत यानं तो सर्वांनाच आकर्षिक करतो. भारताला अशा परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे जो आपल्या नम्रतेनं आपल्या मागण्याही पूर्ण करून घेऊ शकतो, हा रोल शाहरुख चांगला निभावू शकतो.

अर्थमंत्री: आमीर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान योग्य चित्रपट, योग्य ब्रँड आणि योग्य शो ज्याप्रमाणं निवडतो. त्याचप्रमाणं तो व्यवसायातही उत्तम निर्णय घेतो. प्रेक्षक त्यानं केलेल्या जाहिरातीच्या ब्रँडवर डोळे मिटून विश्वास ठेवतात म्हणून आमीर खानकडे अर्थमंत्री खातं सांभाळायला योग्य आहे.

क्रीडा मंत्री: अक्षय कुमार
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा स्टंट मॅन आहे. त्यामुळं तो क्रीडा खात्यासाठी योग्य आहे.

रेल्वे मंत्री: इम्तियाज अली
इम्तियाज अली यांच्या चित्रपटांमध्ये

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 10:12
First Published: Friday, May 16, 2014, 10:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?