www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.
नरेंद्र मोदींशिवाय आणखी कुणी पंतप्रधान होईल, असा मी विचारही करू शकत नाही... मीदेखील नाही... राजनाथ सिंह पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलंय.
झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संभाषण साधताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय. ‘पंतप्रधानपदासाठी मी कधीही नरेंद्र मोदींचा विश्वासघात करू शकत नाही. भाजप पक्षानं जर सरकार बनवलं तर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हे या पक्षाचे एकमेव उमेदवार असतील... दुसरं कुणीही नाही... आणि माझं म्हणाल तर पंतप्रधानपदाबाबत विचार करणंही महापाप असेल’ असं यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 23:04