www.24taas.com, झी मीडिया, रायबरेली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी अखेर आमने-सामने आले आहेत. रॉबर्ट वडेरा यांच्यावर मोदींनी केलेल्या आरोपांना प्रियांका गांधींनी पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राजकीय फायद्यासाठी पती आणि कुटुंबीयांवर चिखलफेक केली जात असल्याचा पलटवार त्यांनी केलाय. विरोधकांकडून वारंवार अपमानित केलं जात असल्यामुळं आपण दु:खी आहोत. मात्र, आपण विरोधकांचा इंदिरांजीसारखाच खंबीरपणे सामना करू, असा निर्धार प्रियांका गांधींनी व्यक्त केलाय. रायबरेलीतल्या सोनिया गांधींच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच मोदी आणि प्रियांकामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात दोघांमध्ये आणखीनच कलगितुरा रंगण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी यांनी कल्याण इथं घेतलेल्या प्रचार सभेत रॉबर्ट वडेरा यांच्यावर टीका केली होती त्याला प्रियांका गांधी यांनी उत्तर दिलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 12:28