मोदींविरोधात व्हॉटस अपवर मेसेज पाठवणाऱ्या तरूणाला अटक

मोदींविरोधात व्हॉटस अपवर मेसेज पाठवणाऱ्या तरूणाला अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बंगलुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मेसेज पाठवणाऱ्या एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एमएमएस मेसेज पाठवले जात होते, मेसेज पाठवणाऱ्या 24 वर्षीय सैय्यद वकाससह इतर चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

चौकशीनंतर इतर चार जणांना सोडून देण्यात आलं, मात्र सैय्यद वकास याला आयटी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकलच्या एका कॉलेजमधून एमबीएचं शिक्षण घेणारा वकास, इंटर्नशीप करण्यासाठी शहरात आला होता.

तो वसंतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. वकासच्या मोबाईलनंबरच्या आधारावर बेलगाम पोलिसांनी त्याला शोधून काढलंय आणि अटक केलीय.

आरटीआय कार्यकर्ता जयंत तिनईकर यांनी ही तक्रार दिली होती. तिनईकर यांना 16 मे रोजी हा एमएमएस मिळाला होता.

या आधी फेसबुकवर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असभ्य वक्तव्य केल्याबद्दल गोव्याच्या एका तरूणावर अटकेची टांगती तलवार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 27, 2014, 08:11
First Published: Tuesday, May 27, 2014, 10:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?