झी २४ तासने यंदा गणेश भक्तांसाठी तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. घरगुती, इको फ्रेंडली आणि सार्वजनिक गणेश फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.
महाराष्ट्रासह जगभरात घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. अशा लाखो गणेश भक्तांनी आपल्या घरातील गणपतींची केलेली सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा.
गणपतीची स्थापना करताना तसेच सजावट करताना पर्यावरणाचा विचार केला असेल. तर अशा इको फ्रेंडली गणपतींची स्पर्धा झी २४ तासने आयोजित केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या गणपतीसह सजावटीचे फोटो आम्हांला पाठवा.
तुमच्या वाडी, गल्ली किंवा परिसरात सार्वजनिक गणेश मंडळ असेल. अनेक सामाजिक उपक्रम आणि आकर्षक सजावट केली असले तर अशा तुमच्या मंडळाचे फोटो आम्हांला झी २४ तास सार्वजनिक मंडळ स्पर्धेत पाठवा.
आणखी व्हिडिओ...