Last Updated: Monday, March 25, 2013, 14:38
www.24taas.com,मुंबईराज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचं कामकाज सुरुवातीला तहकूब करावं लागलं होतं. हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात, असं कारण सांगत पोलिसांनी जामीनास विरोध केला होता. यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे.
तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृहमंत्रालयानं पोलिसांना दिले होते. हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जातोय. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.
निलंबित आमदारांना जामीनपीएसआय सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या निलंबित आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना जामीन मंजूर झालाय. १५ हजारांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आलाय.
शुक्रवारी आमदारांनी पोलीस आयुक्तालयात शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. न्यायालयानं जामीन अर्जावरची सुनावणी सोमवारपर्यंत पुढं ढकलल्यानं शुक्रवार, शनिवार आणि रविवारची रात्र दोन्ही आमदारांना कोठडीत काढावी लागली होती. या आमदारांना महिन्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरी लावाली लागणार आहे.
First Published: Monday, March 25, 2013, 14:38