अफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा, Afzal Guru hanged : Security on high alert in view of the Jammu and

अफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा

अफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा
www.24taas.com, नवी दिल्ली,

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय.

अफजल गुरूला दिल्लीतील तिहारमधील तिसऱ्या नंबरच्या जेलमध्ये लटकवण्यात आले. दरम्यान, गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून तेथील सुरक्षा वाढविण्यात आलीय.

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अफजल गुरू हा बारामुल्ला जिल्हातील रहिवासी आहे. अफजलला फाशी देण्याबाबत शुक्रवारी निर्णय झाला होता. त्याच्या फाशीबाबत शुक्रवारी गृहमंत्रालयाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

फाशीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन दिवसआधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजलचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अफजलच्या फाशीचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल याला फाशी देण्याची मागणी होत होती. १३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता.

First Published: Saturday, February 9, 2013, 09:08


comments powered by Disqus