Last Updated: Saturday, September 29, 2012, 11:17
www.24taas.com,मुंबईमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा राज्यपाल शंकर नारायणन यांनी मंजूर केला. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजभवनमध्ये भेट घेवून पवारांचा राजीनामा सादर केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर त्यांनी राज्यपालाना राजीनामा मंजूर करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे राज्यपालांनी अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे राजीनामा नाट्यावर आता पडदा पडला.
मुंबईत आल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारला आणि पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्य़क्षतेखाली झालेल्या बैठकित राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
विधिमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय घेतला गेला. तर दुसरीकडं सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या बैठकीत होणा-या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत त्यांना निर्णय घेता आलेला नव्हता.
First Published: Saturday, September 29, 2012, 11:09