`दूध का दूध, पानी का पानी` होऊनच जाऊ दे- अजितदादा, ajit pawar on congress

`दूध का दूध, पानी का पानी` होऊनच जाऊ दे- अजितदादा

`दूध का दूध, पानी का पानी` होऊनच जाऊ दे- अजितदादा
www.24tass.com, नगर

`दूध का दूध आणि पानी का पानी` आता होऊनच जाऊ दे. असं म्हणत काँग्रेसवर घणाघाती प्रहारच अजित दादांनी केला आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. आपला राजीनामा मागितला नसून तो आपण तोंडावर फेकलाय अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. सिंचन आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम कऱण्यासाठी होत असल्याचाही घणाघात त्यांनी केलाय.

मी कुणावर नाराज नाही, पण खोटे आरोपही सहन करणार नाही असं सांगत कोळसा घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा आरोप केल्याचा अजित पवारांनी आरोप काँग्रेसवर केलाय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेत निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

First Published: Sunday, September 30, 2012, 14:43


comments powered by Disqus