ही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस Ajit Pawar`s Nautanki

ही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस

ही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस
www.24taas.com, मुंबई

आजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची बातमी झी २४ तासने दिल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया झी २४ तासकडे दिली आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण आपल्यावरील सिंचन घोटाळ्याच्या झालेल्या आरोपांमुळे व्यथित झालो आहोत, असं म्हणाले होते. त्यावर मला क्लीन चीट मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळात परतणार नाही असंही अजितदादा म्हणाले होते. मात्र, त्यांना अद्याप क्लिन चीट मिळाली नसतानाही ते पुन्हा का उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेत आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

क्लिन चीट मिळण्यापूर्वीच अजित पवार यांनी राजीनामा देण्याची तसदी कशाला घेतली? अजित पवार यांची ही सर्व नौटंकी होती. सध्या तरी त्यांना मंत्रिमंडळात येण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी श्वेतपत्रिका काढण्याची धमक दाखवली होती. मात्र श्वेतपत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे अचानक नांगी टाकली आहे. विरोधी पक्षाने काळी पत्रिका तयार केली असून सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांना घेरणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published: Thursday, December 6, 2012, 19:28


comments powered by Disqus