दादा म्हणतात मला नको तुमची मानवंदना... , Ajitdada in kolhapur

दादा म्हणतात मला नको तुमची मानवंदना...

दादा म्हणतात मला नको तुमची मानवंदना...
www.24taas.com, कोल्हापूर

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आज कोल्हापूर दौ-यावर आहेत.. कोल्हापूर विमानतळावर आगमन होताच पोलिसांची मानवंदना अजित पवारांनी नाकारली..

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि मधुकर पिचड हे सुद्धा उपस्थित होते.. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनामुळं त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं..

त्यानंतर अजितदादा आज राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या अंत्यसंस्काराला अजित पवार उपस्थित राहणार आहेत..

First Published: Thursday, September 27, 2012, 12:36


comments powered by Disqus