NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!, congress leader meet in CM home

NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!

NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रवादीने टाकलेल्या दबावातंत्रामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बंगल्याकडे धाव घेतली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगाचा सामना करण्यासाठी काँग्रेसचे नेते वर्षा बंगल्यावर पोचले असून थोड्याच वेळात परिस्थिचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला माणिकराव ठाकरे, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत.

अजित पवारांनी काँग्रेसला दे धक्का दिल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या बैठक झाल्यानंतर लगेचच मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे आपले राजीनामे सोपावले आहेत.

जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्याा आरोपांनंतर उपमुख्यतमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे. पवार यांनी अचानक उचललेल्या पावलामुळे महाराष्ट्रा च्यां राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मात्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारला सध्या तरी काहीही धोका नसल्याचे म्हटंले जात आहे. परंतु काँग्रेसला राज्यात अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे मत आहे.

First Published: Tuesday, September 25, 2012, 20:16


comments powered by Disqus