मीडिया मसाला मिळाला नाही – शरद पवार, Media reports on Pawar vs Pawar wrong: NCP chief

मीडिया मसाला मिळाला नाहीः शरद पवार

मीडिया मसाला मिळाला नाहीः शरद पवार
WWW.24taas.com, मुंबई
सिंचनासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण समर्थन करण्यात येत आहे. सिंचनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर सत्य बाहेर आणावे, याचा शोक्षमोक्ष लागू शकत नाही, तोपर्यंत अजित पवार कोणत्याही पदावर राहणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर अजित पवार यांचा राजीनामा कायम ठेवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारण्याची मी विनंती करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

हा पवार विरुद्ध पवार वाद नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मीडियाला कोणताही मसाला मिळाला नसल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.

आज दिवसभर सुरू असलेल्या जोर बैठकांनंतर शेवटी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली या बैठकीत अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. आता हा राजीनामा आता मुख्यमंत्री राज्यपालांकडे पाठवतील.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, राज्यात जो पेचप्रसंग निर्माण झाला, त्याबद्दल पक्षाच्या आमदारांनी मला लिखित निवेदन दिले. त्यांच्यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली. परंतु, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर असे ठरविण्यात आले की, सिंचनाची श्वेतपत्रिका काढून सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर येत नाही, तो पर्यंत अजित पवार सत्तेत सहभागी होणार नाही.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. तसेच राज्यातील जनतेसमोर याबाबत सत्य समोर येण्यासाठी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
हा पवार विरुद्ध पवार वाद नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मीडियाला कोणताही मसाला मिळाला नसल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.

शरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्य होईल- अजित दादा
यापूर्वी शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी विधीमंडळात भाषण करताना स्पष्ट केले होते.

पाटबंधारे खात्यासंदर्भात माझ्या विरोधात जे आरोप झाले ते एका षड्यंत्राचा भाग आहे, हे षड्यंत्र करणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले, परंतु कोणत्याही व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नाही. पवार साहेब माझे दैवत आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतीम असेल, तसेच माझा प्रत्येक प्रयत्न हा पक्ष वाढीसाठी असेल, असेही अजित पवार यांनी आज विधीमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर बोलताना सांगितले.

राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता. सुमारे दोन तास शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर यशवंतराव सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली, आता सध्या विधीमंडळात सर्व आमदारांसह शरद पवार बैठक संपली असून आता काहीवेळात या राजीनाम्या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे १ तास ५० मिनिटे बैठक घेतली. तसेच ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यात वरील निर्णय घेण्यात आला.

First Published: Friday, September 28, 2012, 17:58


comments powered by Disqus