Last Updated: Tuesday, September 25, 2012, 19:56
www.24taas.com, कोलकाता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलाय. खुद्द शरद पवारही अजित दादांच्या या खेळीमुळे पेचात सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी ‘ही दबावाची खेळी नसून... मंत्र्यांनी राजीनामे दिले तरी सरकार अस्थिर नाही’ अशी ग्वाही देशातील जनतेला दिलीय. ते कोलकाताहून 'झी २४ तास'शी बोलत होते.
राष्ट्रवादीमध्ये तर आता दादांच्या राजीनाम्याचा दुसरा अंक सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रवादीनं सत्तेतून बाहेर पडावं, काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती. त्यानंतर तातडीनं प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव करत राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं म्हटलं होतं. पण आता राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे या दुसऱ्या अंकानंतर राजीनाम्याचा तिसरा काय असू शकेल यावर खल सुरू झालाय.
First Published: Tuesday, September 25, 2012, 19:42