`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे , Supriya Sule on Ajitdada pawar

`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे

`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
www.24taas.com, पुणे, रोहित गोळे

`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि श्रीनिवास पवार फोटो काढण्यासाठी तयार झाले.. मात्र तितक्यात त्यांना त्यांच्या `आवडत्या दादां`ची आठवण झाली.. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेजारीच बसल्याचे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी अगदी गोड आवाजात अजितदादांना साद घातली... `दादा उठ की रं....` असं म्हणताच अजितदादाही चटदिशी उठून फोटो काढण्यासाठी सुप्रिया सुळेसोबत उभे राहिले देखील... आणि हाच गोड क्षण कॅमेरात पटकन कैदही झाला.

पुण्यात वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मुलाचं नामवंत बिल्डर अविनाश भोसले यांच्या मुलीशी आज लग्न थाटामाटात पार पडलं. या `शाही लग्नात` अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रचंड मोठ्या मैदानावर हा शाही लग्नसोहळा रंगला आहे. या लग्नात संपूर्ण पवार कुटुंबिय सहभागी झाले होते. पण मुळात सर्वात जास्त हे लग्न सुप्रिया सुळे यांनी चांगलचं एन्जॉय केल्याचं दिसून आलं... सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू अभिजीत पवार यांना भेटताच सुप्रिया ताईंच्या चेहऱ्यावर प्रचंड हसू आलं.

`दादा उठ की रं`..... असं ताई म्हणाल्या आणि आपण अजूनही या मातीशी जोडलेलो आहोत हे पटकन दिसून आलं. विसरत चाललेल्या कुटूंबव्यवस्थेचं, हरवत चाललेल्या नात्यात आणि गढुळ होत चाललेल्या राजकारणाच्या भाऊबंदकीत अजूनही नात्यातला गोडवा टिकून असल्याचं दिसून आलं. सुप्रियाताई अजितदादांना फोटोसाठी गळ घालतात.. आणि एकाचं फोटोत अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवसा पवार आणि अभिजीत पवार सगळे एकत्र एकाचवेळी..

First Published: Friday, December 7, 2012, 22:10


comments powered by Disqus