आता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन Close darshan of Vitthal

आता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन

आता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन
www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मि णी मंदिर समितीनं आषाढी यात्रेत अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मुखदर्शनाची रांग अगदी तीस फुटांवर नेली आहे.

मुखदर्शनाच्या तीन रांगा केल्यानं तसंच त्यासाठी वेगळं स्टेज केल्यानं दिवसागणिक पस्तीस ते पन्नास हजार भाविकांना विठ्ठलाचं जवळून दर्शन घेता येणारेय. या व्यवस्थेमुळे पददर्शन रांगेवर पडणारा बोजा कमी होणार आहे. आषाढी यात्रेत दहा-बारा लाखांहून अधिक वारकरी येतात. त्यांची विठूरायाचं पददर्शन नाही तर किमान मुख दर्शन मिळावं अशी इच्छा असते. मात्र, गर्दीमुळे आलेल्या सर्वांना मंदिरात प्रवेश मिळत नाही.

हे लक्षात घेऊन मंदिर समितीनं श्री विठ्ठलाचं मुखदर्शन अधिकाधिक वारक-यांना घेता यावं यासाठी यंदा असं नियोजन केलं आहे. बदललेल्या व्यवस्थेमुळे मुखदर्शन रांगेतून दररोज 25 हजारांऐवजी यंदा 55 हजार लोकांना दर्शन घेता येणं शक्य होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 20:07


comments powered by Disqus