गायक अंकित तिवारीला बलात्काराच्या आरोपात अटक‘Aashiqui 2’ singer Ankit Tiwari accused of rape

गायक अंकित तिवारीला बलात्काराच्या आरोपात अटक

गायक अंकित तिवारीला बलात्काराच्या आरोपात अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`आशिकी २` या म्युझिकल हिट चित्रपटात सर्वात प्रसिद्ध `सुन रहा है न तू` हे गाणं गाणारा गायक अंकित तिवारी आणि त्याच्या भावाला आज वर्सोवा पोलिसांनी अटक केलीय.

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकीणीनं आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केलीय. अंकित विरोधात तिनं तक्रार नोंदवली. अंकितनं लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणीनं केलाय.

पोलीस चौकशीदरम्यान अंकितनंही या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं मान्य केलं. पण मुलीला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. आपल्याला याप्रकरणात गोवण्यात आल्याचं अंकितचं म्हणणं आहे.

अंकितसोबत त्याचा भाऊ अंकूर तिवारी यालाही अटक करण्यात आली आहे. संबंधित मुलीला दमदाटी केल्याचा अंकुरवर आरोप आहे. त्यामुळं त्यालाही अटक करण्यात आली.

दरम्यान आज दुपारी या दोघांना कोर्टात हजर करण्यात येणार असून पोलिस चौकशीसाठी त्यांची कोठडी मागण्यात येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 13:01


comments powered by Disqus