अदनान सामीचा विसा संपला, तरीही सामी भारतातच!Adnan Sami`s Visaa ended, but he is still in India

अदनान सामीचा विसा संपला, तरीही सामी भारतातच!

अदनान सामीचा विसा संपला, तरीही सामी भारतातच!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संगीतकार गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी सबाह गालादरी यांच्यातल्या वादानं आता नवं वळण घेतलंय. अदनान सामीचा विसा संपलाय. तरीही तो अजून भारतात राहात आहे असं तपासात आढळून आलंय.

अदनान सामीला यासंबंधी सबाहच्या वकिलांतर्फे सामीची उलटतपासणी करण्यात आली असताना आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं तो म्हणाला. त्याच्या विसा ६ ऑक्टोबरपर्यंतच वैध होता. याबाबत अदनान सामीनंही स्पष्टीकरण दिलंय. आपला व्हीसा ६ ऑक्टोबरला संपल्याचं तो मान्य करतोय. पण व्हीसाचं नुतनीकरण होत असल्याचं त्यानं सांगितलंय.

उलटतपासणीत सामीच्या बँक खात्यांबाबतही चौकशी झाली. पण सामीनं आपण पाकिस्तानी असल्यामुळं भारतात कोणतंही अकाऊंट असल्याचं अमान्य केलंय. सामीच्या उलटतपासणीत उघड झालेल्या या धक्कादायक वास्तवामुळं आता मुंबई पोलीस करतायत काय असा प्रश्न उपस्थित होतोय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 14:56


comments powered by Disqus