`अंकितनं अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची दिली होती धमकी`, ankit threatened to upload rape video i

`अंकितनं अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची दिली होती धमकी`

`अंकितनं अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची दिली होती धमकी`
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

‘आशिकी - 2’ फेम गायक अंकित तिवारी याच्यावर बलात्काराचा आरोप लावणारी तरुणी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं आता समोर आलंय. या तरुणीनं आपल्या जबानीत अंकितनं बलात्कार केल्यानंतर हा अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती, असं म्हटलंय.

अंकितच्या वकिलांनी, अंकित आणि संबंधीत तरुणीनं दोन वर्षांपूर्वीच विवाह केल्याचा तसंच अंकितकडून तीन करोड रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय.

पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अंकीतच्या वकिलांनी केलेले इतर दावेही खोटे आहेत. आपली आणि अंकितची पहिली भेट ऑक्टोबर 2012मध्ये दूर्गा पूजेदरम्यान झाली होती. व्यावसायानं इव्हेंट मॅनेजमेट कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट असलेल्या तरुणीनं आपण कधीही अंकितकडे पैसे मागितले नाहीत. उलट अंकितची आणि माझी ओळख तेव्हा झाली होती जेव्हा बॉलिवूडमध्ये अंकित एन्ट्री मिळवण्याची धडपड करत होता. त्याला मीच फोन खरेदी करून दिला होता. इतकंच काय तर त्याचे बीलही मीच भरले, असा दावा या तरुणीनं म्हटलंय. तो एक करोड रुपयेही कमाऊ शकत नाही तर त्याच्याकडे कुणी तीन करोड कसे काय मागणार? असा उलटप्रश्न यावेळी तिनं केला

‘चार-पाच भेटीनंतर अंकितनं मला प्रपोज केलं होतं. मी त्यावेळी त्याला नकार देऊन आपलं लग्न होणार नाही. कारण, मी घटस्फोटीता असून मला एक मुलगी असल्याचं तेव्हाच सांगितलं होतं. पण, त्यानं मात्र मी माझ्या कुटुंबीयांना समजावेल असं सांगितलं... त्यानं त्याच्या आईशी माझी ओळख एक मैत्रिण म्हणून करून दिली होती’ असं सांगत अंकितचा ‘तिनं आपल्याला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल अंधारात ठेवल्याचा’ दावा फेटाळून लावलाय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 12:41


comments powered by Disqus