Last Updated: Wednesday, October 16, 2013, 14:30
www.24taas.com, झी मीडिया, पुणेअ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड झालीये. या निवडणुकीत एकूण ९०४ मतं पडली. यातली १४ मतं अवैध ठरली. फ मुं शिंदे यांना ४६० मतं मिळाली.
साहित्यिका प्रभा गणोरकर यांना ३३१ मतं मिळाली. अन्य दोन उमेदवार अरूण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे ६० आणि ३९ मतांवर समाधान मानावं लागलं. एरवी साहित्य संमेलनाची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधून घेते. यंदा मात्र कोणतंही वलय नसलेल्या या निवडणुकीत फमुंनी प्रभा गणोरकर यांचा पराभव केलाय.
या निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात होते. दरवर्षी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद रंगतात. यावेळी मात्र असे वाद न रंगल्यामुळे निवडणुकीचा फारसा धुरळा रंगलाच नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 14:30