संदीपच्या जाण्याने सोनू निगमला धक्का,Fans bid tearful adieu to Indian Idol 2 winner Sandeep Acharya

इंडियन आयडॉल संदीपच्या जाण्याने सोनू निगमला धक्का

इंडियन आयडॉल संदीपच्या जाण्याने सोनू निगमला धक्का
www.24taas.com, वृत्तसंस्था, गुडगाव

इंडियन आयडॉल संदीप आचार्य याचे गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तो इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६चा विजेता आहे. दरम्यान, संदीपच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया सोनू निगम याने व्यक्त केलीय.

संदीप हा मुळचा राजस्थानचा. गेल्या पंधरा दिवसांपासून तो कावीळ झाल्याने आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.

संदीपच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसलाय. संदीपचं निधन? अरे देवा...असं कसं झालं...कुणाला कारण माहीत आहे का?, असे ट्विट गायक सोनू निगम याने केले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 13:27


comments powered by Disqus