आज गुगल डूडलवर `गझल सम्राट` जगजीत सिंह, google doodle celebrates 72th birthday of jagjit singh

आज गुगल डूडलवर `गझल सम्राट` जगजीत सिंह

आज गुगल डूडलवर `गझल सम्राट` जगजीत सिंह
www.24taas.com, नवी दिल्ली

प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह यांनी १० ऑक्टोबर २०११ मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. पण, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या गझला आपली सोबत करतच आहेत. याच जगजीत सिंह यांचा आज ७२ वा जन्मदिवस... आणि हा विशेष दिनी गुगलनंही आपल्या ‘डूडल’मार्फत जगजीत सिंह यांच्या आठवणी जिवंत केल्यात.

आज तुम्ही गुगलच्या होम पेजवर जाल तर तुम्हाला तिथे दिसतील हार्मोनियम वाजवताना दंग झालेले जगजीत सिंह... ‘गझल सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगजीत सिंह यांचा आज जन्मदिवस... जगातलं सर्वश्रेष्ठ सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलला त्यांचा फोटो होमपेजवर झळकवला संधी मिळालीय. आजही जगजीत सिंह यांचं संगीत लोकांना भुरळ पाडतं... आजही अनेक लोक त्यांच्या आवाजावर फिदा आहेत याची प्रचिती गुगल डूजलवर जगजित सिंह यांना पाहून येतेय.

जगजीत सिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला होता. त्यांचं फॅन फोलोविंग अख्या जगभर पसरलंय. गझलांची लोकांमध्ये रुची निर्माण करण्याच्या कामात जगजीत सिंह यांचा खूप मोठा वाटा आहे. ब्रेन हॅमरेज झाल्यानं १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या एका वर्षानंतरही ‘गुगल सर्च ट्रेंडर्स’मध्ये जगजीत सिंह हे नाव आघाडीवर आहे, त्यामुळेच आज डुडलवरही त्यांचाच चेहरा आहे.

First Published: Friday, February 8, 2013, 08:54


comments powered by Disqus