Last Updated: Sunday, February 17, 2013, 11:24
www.24taas.com,मुंबईजयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांना राज्य शासनाचा पहिला पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
पाच लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. भारतीय शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणा-या कलावंताला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
भीमसेन हे एक महान कलाकार होते, त्यांच्या नावाने सुरु केलेल्या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली हा मोठा आनंदाचा क्षण आहे अशी भावना किशोरीताईंनी व्यक्त केली.
First Published: Sunday, February 17, 2013, 11:20