Last Updated: Monday, January 14, 2013, 18:19
www.24taas.com, मुंबई गेली अनेक दशकं आपल्या सूरांनी संगीतप्रेमींच्या काळजावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची म्युझिक कंपनी नुकतीच लॉन्च झाली. त्यांच्या ‘एल. एम. म्युझिक कंपनी’चा लॉन्चिंग सोहळा जुहू इथल्या जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये पार पडला.
पंडित जसराज यांच्या हस्ते या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावलीय. बिग बी अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे, नीता अंबानी, सुरेश वाडकर, श्रीदेवी, बोनी कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी या सोहळ्याला उपस्थित होते.
सचिन मी होणार, रांग स्वरांचे, श्री स्वामी समर्थ महामंत्र या म्युझिक अल्बमचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. रसिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलंय. त्यामुळं त्यांच ऋण फेडण्यासाठी आणि संगीतक्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्यांना संधी मिळावी, यासाठी या म्युझिक कंपनीची निर्मिती करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या म्युझिक कंपनीचं दोन महिन्यापूर्वीच या कंपनीचं अनावरण होणार होतं. मात्र बाळासाहेबांच्या निधनामुळं ते लांबणीवर पडलं. त्यानंतर रविवारी हा सोहळा पार पडलाय.
First Published: Monday, January 14, 2013, 18:13