तुमच्या घरी बसून शिका `माधुरी`कडून डान्स...., online dance academy by madhuri dixit

तुमच्या घरी बसून शिका `माधुरी`कडून डान्स....

तुमच्या घरी बसून शिका `माधुरी`कडून डान्स....
www.24taas.com, मुंबई

अभिनेत्री माधुरी दीक्षितनं एक ऑनलाईन डान्स अकादमी सुरू केलीय. स्वत:तला आणि प्रेक्षकांमधल्या समन्वयाचा धागा म्हणून ती या ऑनलाईन डान्स अकादमीकडे पाहतेय.

माधुरीनं ‘डान्स विथ माधुरी दीक्षित डॉट कॉम’ नावाची ऑनलाईन डान्स अकादमी सुरू केलीय. ‘ही डान्स अकादमी हे आमचं पहिलं पाऊल होतं. आणि त्यासाठी आम्ही काही अॅप्लिकेशन बनवले ते आमचं त्यापुढचं पाऊल होतं. माझ्या फॅन्सपर्यंत पोहचण्याचा हा चांगला पर्याय मानते. मला माझ्या प्रशंसकांसाठी काहीतरी करायचं होतं कारण, आत्तापर्यंत त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालंय’ असं या वेबसाईटच्या उद्घाटनाच्या वेळी माधुरीनं म्हटलंय.

माधुरी या वेबसाईटच्या माध्यमातून तिच्या फॅन्सला वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य शिकवणार आहे. माधुरी म्हणते, ‘आम्हाला एक अशी नृत्य अकादमी बनवायचीय जिथं एका छताखाली सगळ्याच प्रकारची नृत्य शिकायला मिळू शकतील. मग, ते भारतीय असो, लोकनृत्य असो, शास्त्रीय नृत्य किंवा पाश्चात्य... माझ्यासाठी नृत्य म्हणजे माझा आवेग’.

लवकरच, माधुरी ‘देढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ या सिनेमांतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. स्वत: माधुरीही ‘देढ इश्किया’ची आतुरतेनं वाट बघतेय. या सिनेमात माधुरीसोबत आहेत... नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी... या सिनेमाबद्दल बोलताना माधुरी म्हणते, ‘नसिरुद्दीन आणि अर्शद दोघेही चांगले अभिनेते आहेत. त्या दोघांबरोबर काम करणं माझ्यासाठी एखाद्या सन्मानापेक्षा कमी नाही’ तर ‘गुलाब गँग’बद्दल बोलताना ती म्हणतेय, ‘की हा खूप वेगळा सिनेमा आहे. या सिनेमातली माझी भूमिकाही दमदार आहे आणि या सिनेमांत काम करायला मला खूप आनंद मिळतोय.’

'डान्स गुरू' माधुरी दीक्षित शिकवणार डान्स...
पाहा व्हिडिओ-http://goo.gl/yjT3S

First Published: Tuesday, February 26, 2013, 17:26


comments powered by Disqus