Last Updated: Wednesday, October 10, 2012, 16:06
www.24taas.com, मुंबई वर्षा भोसले यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे आशा भोसलेंचे हरवलेले पिस्तुल होते, स्वतः आशाताईंनी ही शक्यता वर्तविली आहे. पोलिसांनी आशा भोसले यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. त्यात त्यांनी ही शक्यता वर्तविली.
वर्षा भोसले यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. परंतु, त्यांच्याकडे पिस्तुल आले कुठून? हा प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात घरातील इतर सदस्यांचेही जबाब पोलिसांनी नोंदविले. आशाताईंनी सांगितले की, स्वसंरक्षणासाठी अनेक वर्षांपूर्वी पिस्तुल घेतले होते. परंतु, ते 30 वर्षांपूर्वीच चोरीला गेले होते. त्याबाबत पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती.
घरातल्या इतर दोन सदस्यांकडे पिस्तुल आहेत. पण त्यांचा प्रकार वर्षा यांनी वापरलेल्या पिस्तुलापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आशाताईंनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिस तपास करणार आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासह रचना शाह यांचेही जबाब घेण्यायत आले. लता मंगेशकर यांचेहा जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
First Published: Wednesday, October 10, 2012, 16:06