Last Updated: Wednesday, December 18, 2013, 23:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसाहित्य अकादमीचे २०१३ साठीचे पुरस्कार जाहीर झालेत. सतीश काळसेकर यांना वाचणा-यांची रोजनिशी या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झालाय. तर ज्येष्ठ गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांना लाव्हा या उर्दू काव्यसंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झालाय.
कोकणी साहित्यासाठी तुकाराम रामा शेठ यांना मनमोत्यायम लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा झालीय. यंदा आठ कवीता संग्रह, चार निबंध संग्रह, तीन कांदब-या, प्रवासवर्णन आणि लघुकथा संग्रह यांना प्रत्येकी दोन तर आत्मकथा, नाटक आणि आठवणी या साहित्य प्रकारांना पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्कारांचे वितरण ११ मार्च २०१४ रोजी नवी दिल्लीत होणार आहे. स्मानचिन्ह, शाल एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा २२ लेखक आणि कवींना पुरस्कार जाहीर झाले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हि़डिओ
First Published: Wednesday, December 18, 2013, 22:57