सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री , Sawai Gandharva Bhimsen Music Festival in Pune

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. पुण्यात तिकिटांसाठी रात्रीपासूनच रसिकांच्या रांगा लागल्या आहेत.

संगीत महोत्सवाची सकाळी १० वाजता तिकीट विक्री सुरू झाली. मात्र मध्यरात्री पासूनच तिकीटांसाठी रसिकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक तास रांगेत थांबून रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची तिकीटं घेतायत. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व महोत्सव पुण्यातल्या रमण बाग प्रशाळेच्या मैदानावर रंगणार आहे.

झी २४ तास रसिकांसाठी वेळोवेळी शास्त्रीय संगीताचा नजराणा घेऊन येत असते. दिवाळीमध्ये हार्ट टू हार्टच्या विशेष कार्यक्रमांमध्ये अशीच अनोखी भेट आम्ही घेऊन आलो होतो. बेला आणि सावनी शेंडे, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी आणि जयतीर्थ मेवुंडी या नव्या पिढीच्या शास्त्रीय संगीत गायकांशी गप्पांचा आणि त्यांचं गायन ऐकण्याचा योग आम्ही जुळवू आणला.

आता पुण्यात होणा-या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं सविस्तर वृत्त आणि तिथं पेश होणा-या ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीत मैफीलींचा घरबसल्या अनुभव आम्ही तुम्हाला घडवणार आहोत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 16:15


comments powered by Disqus