Last Updated: Wednesday, April 24, 2013, 18:12
www.24taas.com, झी, मीडिया, नवी दिल्लीप्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी त्याबाबत दु:ख व्यक्त केलं.
हिंदी सिनेमातील `मेरे पिया गये रंगून` आणि `कजरा मुहब्बत वाला` यांसारख्या गाजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध करणा-या प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे मुंबईत निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.
शमशाद बेगम यांनी नुकताच 14 एप्रिलला आपला 94 वा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असल्यामुळे त्या रुग्णालयात दाखल होत्या. काल (मंगळवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ त्यांची मुलगी आणि जवळचे मित्र हजर होते.
First Published: Wednesday, April 24, 2013, 18:12