Last Updated: Sunday, December 15, 2013, 18:19
www.24taas.com, वृत्तसंस्था, गुढगावनुकतीच एक धक्कादायक बातमी आलीय... इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६ मधील विजेता संदीप आचार्य याचं आज सकाळी नऊच्या सुमारास गुडगाव इथल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.
मुळचा बिकानेर राजस्थानचा असलेल्या संदीपनं न्यू जर्सी, अमेरिका इथं "बेस्ट न्यू बॉलिवूड टॅलेंट` हा पुरस्कार जिंकला होता. याशिवाय दिल्ली इथल्या सिरी फोर्ट इथं झालेल्या कार्यक्रमात संदीपला उत्कृष्ट नवोदित पुरुष गायक विभागातील सूर आराधना हा पुरस्कारही मिळाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसांपासून तो कावीळ झाल्यानं आजारी होता. त्याच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. बिकानेर इथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, संदीप आचार्यच्या अचानक जाण्यानं संगीत जगताला मोठा धक्का बसला आहे. संदीप आचार्यचं निधन? अरे देवा... असं कसं झालं... कुणाला कारण माहित आहे का?, अशी प्रतिक्रिया सोनू निगम यानं ट्विटरवरुन दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 15, 2013, 18:19