माणिक वर्मा : संगीतातला माणिक मोती - Marathi News 24taas.com

माणिक वर्मा : संगीतातला माणिक मोती

www.24taas.com, मुंबई
 
प्रसिध्द शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांची आज जयंती आहे माणिक वर्मा यांच्या आरस्पानी स्वराने संगीत क्षेत्रात नवी पहाट झाली.....आपल्या अवीट स्वरांनी संगीतप्रेमींचं जीवन समृध्द करणा-या माणिक ताईंना आमचे शतश: प्रणाम.
 
हा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच...या स्वर्गीय सुरांच्या साथीने संगीतालं एक सुरेल पर्व सुरू झालं...अखंड संगीताचा ध्यास घेतलेल्या माणिक वर्मा यांची संगीतिक कारकिर्दी फुलली ती घरातच..माणिक ताईंच्या आईने त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि मग त्यांच्या आयुष्याचचं सुंदर गाणं झालं...तसंच अनेक संगीतदिग्गजांकडे संगीताचे धडे घेत आणि किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला...(गाणं -घन निळा लडीवाळा...) किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.
 
ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणाने सजलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मायांनीदेखिल गायलीयत....माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या.
 
माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आलाय. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि  रसिकांच्या हृदयात चिरंतन राहिल यात शंकाच नाही...

First Published: Wednesday, May 16, 2012, 15:37


comments powered by Disqus