माधुरीला 'थिरकण्यासाठी' मुंबईत हवा 'भूखंड' - Marathi News 24taas.com

माधुरीला 'थिरकण्यासाठी' मुंबईत हवा 'भूखंड'

www.24taas.com, मुंबई
 
एक, दो, तीन, म्हणत ज्या माधुरीने आपल्या डान्सच्या जोरावर साऱ्यांनाच थिरकायाला भाग पाडलं. त्यामुळे साऱ्यांचाच मनावर माधुरीच्या डान्सची 'मोहिनी' होती. माधुरी आणि डान्स याचं नातं फार जवळचं आहे. त्यामुळे माधुरीला आता डान्ससाठी काही करायची इच्छा झाली आहे. आणि त्यासाठीच माधुरी दीक्षितला मुंबईत डान्स अकादमी स्थापन करायची आहे.
 
त्यासाठी तिने पालिकेकडे भूखंडाची मागणी केली असून माधुरीला भूखंड देण्यासाठी पालिका प्रशासनाने शोधाशोध सुरू केली आहे. माधुरीने पालिका प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. मुंबईत पश्‍चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर दरम्यान २ हजार स्क्वेअरफुटांचा प्लॉट देण्याची मागणी केली आहे. माधुरीने भूखंडाची मागणी केल्यानंतर पालिकेने शंभर स्थळे शोधली असून आणखी शोधाशोध सुरूच आहे. शाळेत जागा नाही माधुरीने भूखंडाची मागणी केली आहे.
 
मात्र त्यांना शाळेत जागा देऊ शकत नाही. पालिकेच्या शाळेत पालिकेच्याच विद्यार्थ्यांना नृत्य शिकवले जाणार असेल तरच त्यांना भूखंड देऊ. पण इतर विद्यार्थ्यांना शिकवू देणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले.
 
 
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 13:59


comments powered by Disqus