Last Updated: Monday, July 30, 2012, 11:53
www.24taas.com, सांगली 
ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं निधन झालं आहे. सांगलीतल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. जवळपास १५० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे.
भिंगरी, थापाड्या, फटाकडी, सासुरवाशिण, पंढरीची वारी हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांनी कै.सदाशिवराव बुवा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. 'सुधारलेल्या बायका' हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट...
भिंगरी गं भिंगरी, कुठं कुठं जायाचं हनिमुनला, हे शिव शंकरा, धरिला पंढरीचा चोर ही त्यांची गाणी विशेष गाजली. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
First Published: Monday, July 30, 2012, 11:53