सांगलीमध्ये अविष्कार संगीत महोत्सव - Marathi News 24taas.com

सांगलीमध्ये अविष्कार संगीत महोत्सव

www.24taas.com, सांगली
 
दहाव्या अविष्कार संगीत महोत्सवाला सांगलीतल्या इस्लामपुरमध्ये सुरूवात झाली आहे. ‘साईज झिरो’ अर्थात परफेक्ट फ्युजन या तालवाद्य आणि नृत्याच्या कार्यक्रमानं या महोत्सवाची सुरूवात झाली.
 
सतारवादक नीलाद्रीकुमार,जगविख्यात ड्रमर जीनो ब्याक्स, तबलावादक पंडीत विजय घाटे, साईड रिदम वादक आग्नेलो फर्नांडिस, गिटारवादक सेन्डन डिसिल्व्हा आणि बासरीवादक राकेश चौरसिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांनी कलाविष्कार सादर केले. गिटार, व्हॉयलीन, ड्रमसेट, बासरी, तबला आणि सतार या वाद्यांची जुगलबंदीही इथे अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीत, फिल्मी आणि लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम या अविष्कार संगीत महोत्सवात सादर केले गेले.
 
यावेळी संगीत आणि शास्त्रीय नृत्याचा मिलाफ रसिकांनी अनुभवला. तीन दिवस चालणा-या या महोत्सवात अशोक हांडे यांचा मंगलगाणी-दंगलगाणी आणि सुदेश भोसले यांचा लाईव्ह इन कंसर्ट सादर केले जाणार आहे.
 
 

First Published: Saturday, January 7, 2012, 19:58


comments powered by Disqus