आशा भोसले गिनिजमध्ये - Marathi News 24taas.com

आशा भोसले गिनिजमध्ये

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
ज्यांच्या आवाजाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात, अशा सर्वांच्या लाडक्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाची नोंद आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.
 
लंडन येथे पार पडलेल्या एशियन अवॉर्डस कार्यक्रमात, आशाताईंना गिनिज सन्मान देताना आशा भोसले यांनी गायलेल्या दम मारो दम, मेहबुबा मेहबुबा(शोले), पिया तू अब तो आजा (कारवॉं) आणि चुरा लिया है तुमने जो दिल को(यादों कि बारात) या गाण्यांचा उल्लेख केला गेला आहे.
 
आशाताईंनी स्टुडिओमध्ये सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेली असल्याने, ही नोंद करण्यात आली आहे. 1947 सालापासून आशाताईंनी 20 भारतीय भाषांमध्ये 11,000 सोलो, ड्युएट्‌स व कोरस असलेली गाणी गायली आहेत.
 
दरम्यान, याबाबत प्रतिक्रीया देताना आशा भोसले म्हणाल्या, सर्वाधिक रेकॉर्डेड गाणी माझी आहेत, हे मला माहीत होते. परंतु मी गप्प होते, पण आज या पुरस्कारामुळे मी जगभरात ओळखली जातेय. खऱ्या अर्थाने माझी खात्री पटली आहे.

First Published: Saturday, November 5, 2011, 13:25


comments powered by Disqus