Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:53
www.24taas.com, मुंबई

मराठी गझलप्रेमींसाठी एक खास खबर...सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांच्या आवाजात नटलेला 'काट्यांची मखमल' हा नवा अल्बम नुकताच लाँच झाला.
वाचताना सहज कळते ती गझल...मोकळा संवाद साधते ती गझल..अशी ही हृदयाला भिडणारी गझल...काट्यांची मखमल हा गझल अल्बम नुकताच लाँच करण्यात आला...सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजाने हा अल्बम नटलेला आहे...यातील मराठी गझल आहेत कवी दिलीप पांढरपट्टे यांच्या तर गझल गंधर्व सुधाकर कदम यांनी संगीत दिलं आहे.
यशवंत देव यांच्या हस्ते हा अल्बम लाँच करँण्यात आला. काट्यांची मखमल या अल्बमच्या नावातच विशेष गोडी आहे असं सुरेश वाडकरांनी या अल्बमबद्दल सांगितलं. दोन ओळींच्या जगण्यातून अनुभवाचा बोल देणारी ही मराठी गझल...काट्यांची मखमल हा नवा गझल अल्बम गझलप्रेमींना निश्चितच आवडेल यात शंकाच नाही.
First Published: Tuesday, January 17, 2012, 23:53