पंतप्रधान कार्यालयाचं 'शुभ्र बिकिनी'त स्वागत ! - Marathi News 24taas.com

पंतप्रधान कार्यालयाचं 'शुभ्र बिकिनी'त स्वागत !

www.24taas.com, मुंबई
 
पूनम पांडेने आपलं लक्ष आता क्रिकेटवरून राजकारणाकडे वळवलं असावं. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यावर आपली नग्न छायाचित्रं प्रकाशित करण्याची हूल देणारी पूनम आता पंतप्रधान कार्यालयाचं ट्विटरवर स्वागत करण्यास आपल्या ‘खास’ स्टाईलने सज्ज झाली आहे.






 

 
स्वघोषित सेलिब्रिटी पूनमने आपले बिकिनीतले सवंग फोटो ट्विटरवर अपलोड करून पंतप्रधान कार्यालयाचं ट्विटरवर स्वागत केलं आहे. पूनमने लिहीलं आहे, “मी ऐकलंय की की पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) आता ट्विटरवर दाखल झालंय. त्यांना माहिती आहे की की पूनम पांडेही ट्विटरवर आहे. म्हणून त्यांच्या स्वागताला माझा हा वेलकमींग फोटो”. या फोटोखाली शीर्षक दिलं आहे- आय कँडी ट्विटहार्ट्स !!! लव्ह यू ऑल.muwaaaaaaaaaaaaaaaaah!!!
पूनम पांडेच्या स्वागतावर पंतप्रधान कार्यालय काय म्हणतंय ते माहित नाही. पण, पूनम पांडे अभिव्यक्ति स्वातंत्र्याला चक्कर येण्याइतपत आपल्या मूलभूत अधिकाराचा वापर करतेय एवढं नक्की !

First Published: Wednesday, January 25, 2012, 22:03


comments powered by Disqus