'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा' - Marathi News 24taas.com

'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

www.24taas.com, चंद्रपूर
 
८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. पण वाचकांच्या काळजाला भिडणारी साहित्यकृती निर्माण होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
 
तसचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे असं मतही सलमान रश्दी प्रकरणासंदर्भात त्यांनी मांडलं. माझं पूर्ण शिक्षण चंद्रपूरात झालं आहे आणि इथेच मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून येणं याचा मला फार आनंद झाल्याचं डहाके म्हणाले.
 
८५ व्या साहित्य संमेलनानिमित्त वसंत डहाके यांनी मात्र वाचकांची पसंती बदलत जात आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीदेखील मोठ्या प्रमाणात बदलत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी चंद्रपूरमधील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 13:16


comments powered by Disqus