कोलावरी फेम धनुष देणार कॉलेजात धडे.... - Marathi News 24taas.com

कोलावरी फेम धनुष देणार कॉलेजात धडे....

Tag:  
www.24taas.com
 
कोलावरी डीने देशातच नव्हे तर जगभरात एकच धूम उडवली दिली. युट्युबवर डाऊनलोड्सचा नवा विक्रम कोलावरी डीने केला. यानंतर धनुषने आता खास सचिन तेंडुलकरसाठी देखील खास गाणं गात आहे.
 
असा हा कोलावरी फेम धनुष वायरल मार्केटिंगचे धडे अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना देणार आहे. कोलावरी डीमुळे घराघरात पोहचलेला धनुष आज आयआयएम अहमदाबादमध्ये लेक्चरच्या माध्यमातून गाणं कसं तयार झालं याची कथा विद्यार्थ्यांना सांगणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
 
धनुष आणि संगीत दिग्दर्शक अनिरुध्द रवीचंदर आयआयएम अहमदाबादच्या कंटेमपररी फिल्म इंडस्ट्रीच्या १३० विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देणार आहेत. तेव्हा आयआयएमच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे..
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 23:21


comments powered by Disqus