Last Updated: Monday, November 7, 2011, 05:56
झी २४ तास वेब टीम, पुणे पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं सात ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलयं. संगीत महोत्सवाचं हे ५९ वं वर्ष आहे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या पुढाकारानं य़ा संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येत होतं. त्यांच्य़ा मृत्यूनंतर हा पहिलाच सवाई गंधर्व महोत्सव आहे. पंडित भीमसेन जोशींना हा महोत्सव समर्पित असणार आहे. दरवर्षी चार दिवस चालणारा हा महोत्सव यंदा मात्र पाच दिवस चालणार आहे.
पुण्यातल्या रमण बागेतल्य़ा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.
First Published: Monday, November 7, 2011, 05:56