ती गेली तेव्हा रिमझिंम (कवी ग्रेस) - Marathi News 24taas.com

ती गेली तेव्हा रिमझिंम (कवी ग्रेस)

ती गेली तेव्हा रिमझिंम
 
 
ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता
 
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता
ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
 
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
 
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
 
चित्रपट : निवडुंग
 
गीत : ग्रेस
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर

First Published: Monday, March 26, 2012, 13:38


comments powered by Disqus