पुण्यात वीकएंडरची धूम - Marathi News 24taas.com

पुण्यात वीकएंडरची धूम

झी २४ तास वेब टीम, पुणे
संगीत शौकिन ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात तो, तीन दिवसांचा एनएच 7 (NH7) विकएंडर म्युझिक फेस्टिव्हल पूण्यात सुरू होत आहे. संगीत जगतातील नव्या आणि ख्यातनाम आर्टिस्टची हजेरी आणि मन बेधुंद करणारी संगीताची मेजवानी हे विकएंडरचे खास वैशिष्ठ्यं.
 
ग्रॅमी विजेता इमोजेन हिप, ब्रिटीश इलेक्ट्रॉनिक म्युझिक ड्य़ुओ बेसमेंट जॅक्स तसंच भारतीय बँड मिडिवल पंडित्झ, रघु दिक्षीत, जलेबी कार्टेल, इंडियन ओशन, स्वरात्मा यासारख्या एका पेक्षा एक ग्रुप विकएंडरमध्ये हजेरी लावणार आहेत. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद, सहभाग आणि पाठिंबा अभूतपूर्व होता असं आयोजन समितीचे अरविंद कृष्णन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय आणि देशातील ख्यातनाम बँडसच्या वेड लावणाऱ्या परफॉर्मन्सेसमुळे विकएंडर वर्षभर चर्चेत राहतो. विकएंडरमध्ये संगीताबरोबरच सेलिब्रिटी टाटू आर्टिस्ट समीर पतंगेचं टाटू रिपब्लिक, द विकएंडर बाजारातील खरेदीचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.

First Published: Friday, November 18, 2011, 11:41


comments powered by Disqus