पं. राम मराठे संगीत समारोह - Marathi News 24taas.com

पं. राम मराठे संगीत समारोह

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
नंदिनी बेडेकर यांचे सुश्राव्य गायन, सत्यजित तळवलकर यांचे तबलावादन  आणि कथ्थक नृत्यांगना आदिती भागवत यांचा नृत्याविष्कार चढविलेला कळस यामुळे संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोहाचा पहिला दिवस गाजला.
 
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अ. भा. नाट्य परिषदेच्या सहकार्याने राम गणेश गडकरी रंगायतन येथे १८ व्या संगीतभूषण राम मराठे संगीत स्मृती संगीत समारोहाचे काल महापौर अशोक वैती यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आपल्या भाषणात महापौर वैती यांनी पालिकेच्यावतीने चालविण्यात येणार्‍या या संगीत समारोहाचा नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसंच गेल्या वर्षी जाहिर केल्याप्रमाणे यावर्षी शास्त्रीय संगीतातील नामवंताचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
 
यावेळी उपमहापौर मनोज लासे, सभागृहनेते पांडुरंग पाटील, ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन, नाट्यपरिषदेचे कार्यवाह विद्याधर ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

First Published: Friday, November 18, 2011, 16:25


comments powered by Disqus