Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:57
झी २४ तास वेब टीम, मुंबईमुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाने आंतर विद्यापीठ सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील इन्टरनॅशनल स्टुडंट्स हॉलमध्ये बडोद्याच्या महाराज सयाजीराव विद्यापीठाचे अध्यापक आणि विद्यार्थी आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण करतील.
रोमिल जानी आणि जान्हवी गोर यांचे सुगम युगल गायन तसेच भावीन निगंटीचे एकल तबलावादनाचा या कार्यक्रमात समावेश आहे. तसंच शिक्षक भरत महंत यांचे शास्त्रिय गायन आणि बाळकृष्ण महंत यांचे एकल तबलावादन ऐकता येणार आहे.
First Published: Wednesday, November 23, 2011, 10:57