हॅपी बर्थ डे आशाताई! Today 81th Birthday of Singer Asha Bhosle

हॅपी बर्थ डे आशाताई!

हॅपी बर्थ डे आशाताई!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. आशा भोसले आज ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशा यांच्या जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली सांगलीत झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९४३ साली केली.

गेल्या सहा दशकांपासून त्यांनी आपल्या सुमधूर आवाजानं हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केलंय. हिंदी, मराठी आणि परदेशी भाषांमधूनही त्यांनी गायन केलंय. १२ हजारांहून अधिक गाणी गावून त्यांनी जागतिक विक्रमाला गवसणी घातलीय. त्यांच्या कार्याची दखल घेऊन चित्रपट सृष्टीतील सर्वेच्च असणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यातं आलं. तर शासनानं त्यांना २००८ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केलाय.

अतिशय सुरेल लांब पल्ल्याचा आवाज, आवाजाची पोत बदलण्याची क्षमता, श्वासाचा परिणामकारक वापर, प्रभावी भावाविष्कार, संथ लयीपासून उडत्या चालीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या भाषेतील गाणी सादर करण्याची विलक्षण हातोटी ही ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या गाण्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील.

एखादा कलावंत घडतो तेव्हा त्याच्यातील उपजत गुणांबरोबर अन्य गोष्टींचीही आवश्यकता असते. निरीक्षणशक्ती, ग्रहणशक्ती, साधना, प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्षाची तयारी अशा अनेक गोष्टींमधून तो स्वतःला घडवत असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले.

आशाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013, 13:06


comments powered by Disqus