छेडछाडीला कंटाळून १२ वर्षीय मुलीने जाळून घेतलं, 12 year girl attempt suicide

छेडछाडीला कंटाळून १२ वर्षीय मुलीने जाळून घेतलं

छेडछाडीला कंटाळून १२ वर्षीय मुलीने जाळून घेतलं
www.24taas.com, उस्मानाबाद

छेडछाडीला कंटाळून इयत्ता पाचवीतल्या १२ वर्षीय मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या रुई गावातली ही घटना आहे.

जाळून घेतल्याने मुलगी सुमारे ५० टक्के भाजली आहे. या मुलीला तातडीने बीडमधील लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी मात्र फरार झाला आहे. त्यामुळे महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत लवकरात लवकर कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

First Published: Friday, January 4, 2013, 14:32


comments powered by Disqus