Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:04
www.24taas.com, औरंगाबाद एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पुरुष जातीची दोन जिवंत अर्भकं सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ही अर्भकं सापडली आहेत.
नांदेड-मनमाड ही पॅसेंजर ट्रेन औरंगाबाद स्थानकावर आली असताना हा प्रकार उघडकीस आला. ही दोन्ही अर्भकं अवघ्या दोन दिवसांची आहेत. आज पहाटे दोनच्या सुमारास सफाईकामगार बोगी साफ करत असताना त्यांना एक बेवारस पिशवी आढळली, त्यात ही अर्भकं ठेवली होती. हा सगळा प्रकार सफाई कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर या दोनही अर्भकांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या दोन्ही अर्भकांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. आता ही अर्भकं कोणी ठेवली याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.
First Published: Sunday, March 3, 2013, 16:04