Last Updated: Monday, September 17, 2012, 15:51
www.24taas.com, औरंगाबादआज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.
निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली रणसंग्राम उभा राहिला.. या संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली, अनेकांनी आपल्या घरदारांवर पाणी सोडून या लढ्यात उडी घेतली आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शऱण आला आणि मराठवाड्य़ाच्या मातीने स्वातंत्र्याचा श्वास घेतला.. याच हुतात्मांना अभिवादन करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो..
यावेळी मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर स्थिती असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी मान्य़ केले आणि मराठवाड्याला सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.. कार्यक्रम आटोपल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्य़ांनी पत्रकारांच्या कुठल्य़ाही प्रश्नाला उत्तर न देता काढता पाय घेतला.
First Published: Monday, September 17, 2012, 15:51