पोलिसांच्या भरधाव गाडीला अपघात, सहा ठार, Amaravati, Police, Accident

पोलिसांच्या भरधाव गाडीला अपघात, सहा ठार

पोलिसांच्या भरधाव गाडीला अपघात, सहा ठार
www.24taas.com, झी मीडिया,अमरावती

अमरावती पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात तीन पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल्स अशा सहा जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झालेत.

अमरावती कारंजा रोडवरील कामरगावजवळ हा अपघात झालाय. कारंजा परिसरातल्या एका आश्रमशाळेतील कर्मचा-यावरील कारवाई पूर्ण करुन हे पथक अमरावतीकडे परतत होते. यावेळी भरधाव पोलिसांची गाडी रस्त्यालगतल्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलयं.

First Published: Wednesday, May 1, 2013, 20:39


comments powered by Disqus