Last Updated: Thursday, February 7, 2013, 12:27
www.24taas.com, औरंगाबाद क्षुल्लक कारणावरून भावी नवरदेवानं आपल्या नियोजित वधुला जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. विशेष म्हणजे हा नवरदेव भारतीय सैन्यदलात काम करतो.
हळद लागण्यापूर्वीच लग्नाचे कपडे खरेदीवरुन झालेल्या वादातून सचिन हनुमंते या भावी नवऱ्यानं तरुणीला जिवंत जाळल्यानं औरंगाबादमध्ये एकच खळबळ पसरलीय. संबंधित तरुण आणि तरुणीचं ‘व्हेलेंटाईन डे’ला १४ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होतं. त्याचीच तयारी मोठ्या जोरात सुरू होती. खरेदीसाठी धावपळ सुरू होती. कपडे खरेदीला जाण्यासाठी सचिननं आपल्या भावी वधुला बहिणीच्या घरी बोलावलं होतं. तिथंच या दोघांमध्ये कपडे खरेदीवरून वाद निर्माण झाला आणि या क्षुल्लक वादाचीच परिणीती एका भयंकर गुन्ह्यात झालीय.
वादामुळे चिडलेल्या वरानं आपल्या भावी वधुच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत तरुणी ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय. तरुणीला जाळणारा हा जवान लष्करात नोकरीला आहे.
First Published: Thursday, February 7, 2013, 10:01